Vartahar Times
other देश

दिलासादायक! राज्यात आज 24,752 नवे रुग्ण सापडले, 453 रुग्णांचा मृत्यू

banner

मुंबईः राज्यावरचं कोरोनाचं मोठं संकट असून, शासन स्तरावरूनही अनेक उपाययोजना राबवण्यात आल्यात. राज्यातील लॉकडाऊनही 1 जूनपर्यंत वाढविण्यात आलाय. ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 24 हजार 752 रुग्ण सापडलेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. पण राज्यात कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. राज्यात आज 453 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. सध्या राज्यातील मृत्युदर 1.62% एवढा आहे. (maharashtra corona virus In the maharashtra 24,752 new patients were found today 26 may 2021, 453 patients died)

राज्यात आज एकूण 24,752 ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज 24,752 नवीन रुग्णांची नोंद झालीय. राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 56,50,907 एवढी झालीय. आज 23,065 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 % एवढे झालेय.

सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 1,021 रुग्ण बरे

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 27 हजार 943 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात 1,362 रुग्णांची नोंद झालीय.

संबंधित बातम्या

Related posts

मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाल्यानंतर आता शहरातील पाणीपुरवठ्यावरही (BMC )परिणाम झाला आहे.

Sanjiv Ahire

महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज

Sanjiv Ahire

विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर अपघात यात टेम्पो पलटी व रिक्षा चालक जखमी

Sanjiv Ahire

Leave a Comment