दिनांक 29 जुलै 2021 रोजी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान विश्वतेज साळवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान विलास जाधव माजी भारिप विधानसभा अध्यक्ष मुक्काम नडगाव तालुका महाड यांचे निवासस्थानी पक्ष संघटन नवीन पक्ष प्रवेश व पक्ष विस्तार असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला माननीय साळवी साहेब यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष विस्तारासाठी हालचाली सुरू केल्या आहेत दोन दिवसांपूर्वी कामोठे पनवेल येथे वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेची स्थापना करून महाड तालुक्यातील एमआयडीसी विभागात नडगाव येथे सर्व आजी माजी कार्यकर्त्यांना तरुण वर्गाला आंबेडकर विचारांनी भारावलेले कार्यकर्ते आशा अनेकांची सभा बोलावून त्यांना वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील होण्याचे आवाहन केले सदर सभेमध्ये शैलेश पवार , योगेश शेलार , विलास सविनकर आणि कार्यकर्त्यांनी वंचित मधे अनेकांनी प्रवेश केला माननीय साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये व सभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्ष विस्तारासाठी आजी-माजी कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन येणाऱ्या काळात पक्ष विस्तारासाठी महाड तालुका कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारची सर्वांनी ग्वाही दिली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रस्थ नक्कीच वाढलेले असेल सर्वांनी विश्वास व्यक्त केला सदर मिटिंग मध्ये उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडत असताना रायगड जिल्हा सचिव आयुष्यमान श्रीहर्ष कांबळे म्हणाले की आपण विविध पदावर काम करत असलो तरी कोणत्याही पदा पेक्षा बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे असे परखड विचार व्यक्त केले त्याचबरोबर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सखाराम सपकाळ साहेब यांनी भीमा कोरेगाव आंदोलनाच्यावेळी तरूणांवर झालेल्या पोलीस केसेस त्वरित काढल्या जाव्यात तसेच तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचे आवाहन केले त्याचबरोबर भारिप-बहुजन संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव तांबे म्हणाले की आजी-माजी सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांवर अति शिंतोडे न उडवता एकदिलाने काम करावे सर्व हेवेदावे बाजूला सोडून येत्या काळात आपण मजबूत पक्ष विस्तारित करून त्याची बांधणी करूयात तसेच वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा माजी अध्यक्ष विधानसभा उमेदवार 2019 श्रीमान संजय घाग साहेब आपले विचार मांडताना म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात बाळासाहेबांची भूमिका सर्व मराठा समाजात मांडण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना आपण सामोरे गेलो पाहिजे अशा प्रकारचे आव्हान सर्वांना केले महाड तालुका उद्योजक मंगेश तांबे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की पक्ष विस्तारासाठी किंवा पक्षबांधणीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे वेळ तेव्हा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणारी माणसं निर्माण केली पाहिजेत आणि आम्ही स्वतःला वेळ देण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांना त्यांनी दिला तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्हा सदस्य आयुष्यमान शिवराम पाटेकर म्हणाले सर्वांनी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा पक्ष आपण वाढवला पाहिजे आणि बाळासाहेबांचा झेंडा आपण सर्वांनी उंचावला पाहिजे माननीय महेश येलवे रायगड जिल्हा सहसचिव म्हणाले की आपण सर्वांनी एकत्रित काम करावे आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे यावेळी महाड शहर अध्यक्ष सोनू कासारे, शहर सचिव किरण व्हाघमारे, तालुका उपअध्यक्ष सिद्धार्थ जाधव, युवक तालुका अध्यक्ष सचिन जाधव, तालुका सचिव सुदेश निकम, तालुका सदस्य मिलिंद जाधव वंचित बहुजन आघाडी क्रांती भूमी महाड सर्वधन समिती अध्यक्ष श्रीकांत कांबळे गुरूजी, जिल्हा सदस्य शिवराम पाटेकर, महिला अध्यक्षा इंदू ताई खंदाग्रे, माजी जिल्हा उपअध्यक्षा विद्याताई जाधव, माजी भारिप जिल्हा उपअध्यक्षा बेबीताई सरकते , मंगलताई बनसोडे, माजी भारिप तालुका सचिव उद्योजक मंगेश तांबे साहेब, माजी विधासभा अध्यक्ष विलास जाधव, भारिप माजी शहर युवक अध्यक्ष आंनत पवार, अनेक मान्यवर उपस्थित होते , अशाप्रकारे माननीय विश्वतेज साळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर सभा संपन्न झाली
( महाड नितेश लोखंडे )