महाड तालुक्यातील बिरवाडी येथील रहिवासी पत्रकार दीपक साळुंखे यांचे आज पहाटे कोरोना मुळे निधन. पत्रकार दीपक साळुंखे यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यामध्ये शोककळा पसरली.
महाड तालुक्यासह बिरवाडी शहरांमध्ये होणाऱ्या अन्याय कारक घटनांच्या विरोधात बेधडकपणे सलग 14 वर्षे दैनिक रायगड टाईम्स, लोकमत, पुढारी अन्य वृत्तपत्र तसेच सलाम रायगड इलेक्ट्रॉनिक मिडीया द्वारे भल्या भल्यांच्या विरोधात खळबळजनक वृत्त देणारा सच्चा ,निर्भीड ,डॅशिंग पत्रकार दीपक साळुंखे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी रोहा येथे दुपारच्या सुमारास होणार आहे.
पत्रकार दीपक साळुंखे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.व ते आमदार भरत शेठ गोगावले यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय होते.
रामदास चव्हाण