आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे १७ ते १८ वर्ष ठेका (काँट्रॅक्ट) पद्धतीत काम करणाऱ्या कामगारांना मिळाला न्याय पंधरा कामगारांना केले कायमस्वरूपी
महाड औद्योगिक क्षेत्रात एक्वा फार्म कंपनी मध्ये गेली १७ ते १८ वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्या १५ कामगारांना आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे कंपनी प्रशासना सोबत वेळोवेळी बैठका करून कायमस्वरूपी करण्यात यशआले
– संतोष कालगुडे’ सतीश सपकाळ ‘चंद्रकांत भुतकर, रुपेश विचारे, संजय पवार ,कौशिक मोरे, देविदास कदम, संतोष भोसले, तुकाराम उबरटकर, गोविंद पोटे, काशिनाथ पार्टे,मंगेश लामजे, राजू शिर्के, योगेश महाडिक, इत्यादी कामगारांना सदर कंपनीमध्ये कायमस्वरूपी करण्यात आले आहेत या कामगारांना सतरा अठरा वर्षानंतर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाला असून या कामगारांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आभार मानले त्यांचा एथोचित सन्मान सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आला
आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी उपस्थित कामगार वर्गांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाड औद्योगिक क्षेत्रात इतर कंपनीत देखील अनेक वर्षांपासून ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या कामगार वर्गास शिवसेना संघटनेच्या माध्यमातून अशाच प्रकारे कंपनीत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,तसेच या औद्योगिक क्षेत्रात कामगार वर्ग असो किंवा कंपनी प्रशासन असो किंवा नवीन येणारे उद्योग धंदे असतील त्यांना आपण आमदार या नात्याने व शिवसेना संघटनेच्या वतीने देखील लागेल ते सहकार्य करत आहोत,या कारणामुळेच आपल्या MIDC मध्ये नवीन कारखाने मोठ्या संख्येने येत आहेत असे गोगावले यांनी सांगितले
महाड ( नितेश लोखंडे )