महाड घरोशीवाडी येथे ट्रेकींगला गेलेला तरुण पडून गंभीर जखमी. जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
सविस्तर माहिती अशी की आदित्य कदम व प्रथमेश जाधव हे महाड येथील दोन तरुण रविवारी दुपारी महाड येथून किल्ले रायगड परिसरातील घरोशीवाडी गावचे हद्दीतील उंच डोंगर कड्यावरील ट्रेकींगसाठी गेले होते दुपारी २.०० वाजताचे दरम्यान डोंगर कड्यावर चढाईला सुरवात केली असता २०० फुट उंच डोंगरावर गेले असता आदित्य कदम (वय २५ वर्षे ) या तरुणाचा पाय घसरून तोल गेल्याने २०० फुट खाली कोसळला त्या मध्ये तो गंभीर जखमी झाला. यावेळी बरोबर असणारा दुसरा तरुण प्रथमेश जाधव हा सुखरूप असल्याने त्यांनी मोबाईल द्वारे साळुंखे रेस्क्यू टिम, महाड यांचेशी संपर्क साधून झालेली हकिगत कळविली. त्यानंतर साळुंखे रेस्क्यू टिम चे सदस्य मनोज रेशीम, संदेश जंगम, निखिल सागवेकर, विकी साळुंखे, प्रणित साळुंखे, ओंकार सागवेकर, प्रफुल धामणस्कर, स्वप्नील रेवाळे व अक्षय कदम हे एका तासात घटनास्थळी पोहचून स्थानिक ग्रामस्थ जयेश लांमजे, विजय पाचाडकर, अनंत चव्हाण व चंदू कडू यांचे मदतीने शोध सुरु करण्यात आला .त्यावेळी आदित्य कदम हा गंभीर जखमी होऊन पडलेला अवस्थेत मिळून आला यावेळी घनदाट जंगल व डोंगर दरीतून ग्रामस्थ व साळुंखे रेस्क्यू टिमने ३०० मीटर खांद्यावर व ट्रेचरवर जखमी अवस्थेत संध्याकाळी ०६.०० वाजता बाहेर काढण्यात यश आले व पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने डॉ. रानडे हॉस्पीटल महाड येथे दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर दुखापत झाले असल्याने पुढिल उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असता अखेर त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते.
महाड ( नितेश लोखंडे )