*महाड शहरातील आणखी एक पूल धोकादायक. शहरातील गांधारी पुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असल्याचे लावण्यात आले फलक.*
रायगड जिल्ह्यामध्ये सतत तीन-चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नद्या-नाले ओसांडून वाहत आहेत.त्यामध्येच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे जाणे तसेच काही ठिकाणी छोटे पूल कोसळणे, पुलावरून पुराचे पाणी जाणे ह्या घटना वारंवार होत आहेत. असे असतानाच महाड शहरातील गांधारी पुलावर प्रशासनाने गांधारी पुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद आहे असे फलक लावण्यात आले आहे.
सदरचा पूल हा कमकुवत असल्यामुळे त्या पुलावरून कोणत्याही अवजड वाहनांनी वाहतूक करू नये असे प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. सदर चा फलक मुंबई-गोवा हायवे पासून 500 मिटर अंतरापासून महाड शहरामध्ये प्रवेश करताना गांधारी पुलाच्या दोन्ही बाजूला फलक लावण्यात आलेला आहे.
महाड ( नितेश लोखंडे )