मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला; तिघांना अटक
मुंबई: मुंबईतील वकील सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीनं झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मोबाइल कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या दृश्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
बोरीवलीच्या एम एच बी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, महाराष्ट्र हत्यारबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.