Vartahar Times

करोना काळातही बार सुरू; दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित

शहरात करोनाचे निर्बध लागू असतानाही दुसरीकडे मात्र शहरामध्ये बार सुरु असल्याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून ही कारवाई पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करून ठाण्यातील काही बार सुरु असल्याबाबत एका वृत्तवाहिनीने स्टींग ऑपरेशन केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसेच या प्रकरणी पोलिस आयुक्तांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले.

नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच संबधित आर्केस्ट्रा बार अँड रेस्टोरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या बरोबरच ठाणे महापालिकेसही हे आर्केस्ट्रा बार अँड रेस्टोरंट सील करण्याविषयी कळवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts

महाड तालुक्यातील वरंध येथील धरणात बुडून तरुणाचा मृत्यु.

Sanjiv Ahire

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पकडले

Admin_Webmaster

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला; तिघांना अटक

Sanjiv Ahire

Leave a Comment