विक्रोळी मध्ये राष्ट्रीय पोषण अभियानचे आयोजन
बृहन्मुंबई महानगरपालिका व बालविकास प्रकल्प यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या सकस “आहार पोषण”कार्यक्रम झाला. किशोर वयिन मुलींचे व माता आणि बालके सदृढ राहावी यासाठी विविध उपक्रम राबविले . या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी विक्रोळीत पोषण अभियान बुधवार १ सप्टेंबर रोजी अभियान राबविले गेले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, घोषणा बाजी, पोषण मेळावे आदी उपक्रम राबविण्यात आले किशोर वयिन मुलींचे स्वच्छता,आहार,विविध नाट्य मार्फत जनजागृती,मुलींचं रक्त तपासणी,गरोदर मातांच संगोपान,महानगर पालिका मधिल विविध मुलींसाठी व गरोदर मातांसाठी योजना,या सर्वांचे मार्गदर्शन केले जाणार आहे पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर अधिक माहिती देण्यात आली पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयींचे महत्त्व पटवून देण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजता विक्रोळी कांजूरमार्ग बालविकास प्रकल्प अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. योगेश भालेराव आणि नंदिता काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
विक्रोळी प्रतिनिधि – राकेश साळवी