देश

छापा टाकायला गेले पण घडलं भलतंच! पोलिसांनाच ओलीस ठेवलं, गुन्हेगारांचं धक्कादायक कृत्य; घटनेनं सारेच चक्रावले

पाटणा : बिहारच्या बांका जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी विशेष मोहिमेदरम्यान छापा टाकून देशी बनावटीचे दोन मस्केट, एक एअर गन, तीन जिवंत काडतुसे आणि ७ गोळाबारुद जप्त केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसा बनियाचक बहियार येथे काही गुन्हेगार शस्त्रांसह काही मोठा प्रताप करण्याच्या तयारीत होते, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच धनकुंड पोलीस ठाण्याचे प्रभारी छोटू कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली.

याप्रकरणी ठाणे प्रभारींनी एक पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकण्यासाठी सापळा रचला. पण धक्कादायक म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. चौकशीदरम्यान गुन्हेगारांना कळले की, हा पोलिस कर्मचारी धनकुंड पोलिस स्टेशनचा निरीक्षक छोटू कुमार आहे. त्यानंतर गुन्हेगार आपली हत्यारे तिथेच सोडून फरार झाले.

तत्पूर्वी गुन्हेगारांनी पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली एवढेच नाही तर त्यांची अधिकृत पिस्तूल हिसकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र गुन्हेगारांना तो प्रयत्न फोल ठरला. यातच ते गुन्हेगारांकडे अनेक लहान-मोठ्या शस्त्रांचा साठा होता. पोलिसांनी छापा टाकताच साऱ्यांनाच पळता भुई थोडी झाली. त्यानंतर माहिती मिळताच धौरेया पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार हेही पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस पाहून सर्व गुन्हेगार आपली शस्त्रे टाकून घटनास्थळाहून पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व गुन्हेगार काही शस्त्रे घेऊन पळून गेले आहेत. याप्रकरणी धनकुंड पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्या लेखी अर्जावरून धोरैया पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये खरौंधा जोथा पंचायत प्रमुख निभादेवी यांचा मुलगा जितेंद्र भारती उर्फ जीतू, जोथा गावातील रहिवासी डब्ल्यू चौधरी, प्रशांत सिंग, बबलू सिंग, सित्तू चौधरी, राहुल कुमार, सोनू चौधरी यांच्यासह पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच बौन्सीच्या एसडीपीओ अर्चना कुमारी, राजून सर्कल पोलीस निरीक्षक रणजीत कुमार आणि बराहत, पंजवाडा आणि नवादा पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन प्रभारी देखील पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले. एसडीपीओच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नामांकित आरोपींच्या घरावरही छापा टाकला. मात्र सर्व आरोपी घरातून पसार झाले. या संपूर्ण प्रकरणात एसडीपीओ बौन्सी यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *