जोरदार वाद आणि थेट केले पतीने पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर, मोठी खळबळ, गुन्हा दाखल
उत्तर प्रदेश : एक अतिशय धक्कादायक आणि हैराण करणारी घटना पुढे येताना दिसतंय. पतीवर पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. फक्त आरोपच नाहीतर पतीविरोधात पत्नीकडून तक्रार देखील दाखल करण्यात आलीये. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. पतीने आपले अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप हा पत्नीकडून लावण्यात आलाय. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या दिलदारनगरमधील आहे. पीडित महिला ही दिलदारनगर येथील रहिवासी आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्लील फोटो आणि व्हिडीओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केल्याप्रकरणी पती रघुराज प्रताप सिंह याच्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केलीये. महिलेचा आरोप आहे की, माझे आणि पतीचे वाद झाले. त्यानंतर त्याने जाणूनबुजून माझे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. पतीने फोटोंची लिंक तिच्या भावाच्या आणि बहिणीच्या व्हॉट्सॲपवरही पाठवली.
व्हायरल फोटो आणि व्हिडीओमुळे महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागतोय. या घटनेनंतर महिलेले दिलदारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत आरोपी रघुराज प्रताप सिंग याच्याविरुद्ध कलम 67A अन्वये सायबर गुन्हे आणि अश्लील साहित्य शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये.
पोलिस आता याप्रकरणी तपास करत आहेत. पती आणि पत्नीमध्ये वाद नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याबद्दलही पोलिसांकडून माहिती घेतली जातंय. वादानंतर पती इतका जास्त रागात होता की, त्याने थेट पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. वादानंतर पत्नीचे अशाप्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक करवाई व्हावी, अशीही मागणी आता केली जातंय. या घटनेने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. या घटनेने महिलेला मोठा धक्का बसलाय. कोणताही पती अशा प्रकारचे कसे वागू शकतो, असा प्रश्नही निर्माण झाला.