करमणूक

बालपणीचं प्रेम अधुरंच, भविष्याची स्वप्न रंगवली पण कॅन्सरने गर्लफ्रेंडला हिरावलं, विवेकची अर्धवट Love Story

मुंबई- बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेया मुलाखतीत त्याने कधीही न शेअर केलेले वैयक्तिक किस्से सांगितले. यावेळी विवेक म्हणाला की, प्रियंका अल्वा त्याच्या आयुष्यात येण्याआधी त्याचे मन अनेकदा दुखले होते आणि त्यासाठी त्याला खूप दु:खात जावे लागले होते. या वेळी विवेकने त्याच्या बालपणातील प्रेमाची वेदनादायक घटनाही सांगितली, जिच्यावर त्याने अपार प्रेम केले पण कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. विवेक ओबेरॉयच्या म्हणण्यानुसार, ती आता गेली हे स्वीकारण्यास त्याचे मन सतत नकार द्यायचे.

‘MensXP’ ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने त्याच्या बालपणीच्या गर्लफ्रेंडची लव्हस्टोरी शेअर केली. अभिनेत्याने सांगितले की तो १३ वर्षांचा होता, तर त्याची मैत्रीण १२ वर्षांची होती. दोघेही एकमेकांना डेट करत होते.

विवेकने सांगितले की, त्याने आपल्या मैत्रिणीसोबत आपले आयुष्य घालवण्याचा आणि भविष्याचा निर्णय घेतला होता, परंतु जेव्हा त्याच्या प्रेयसीला वयाच्या १७ व्या वर्षी कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा त्याला धक्काच बसला. तो म्हणाला, ‘हे माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे. बालपणी माझी एक गर्लफ्रेंड होती, ती १२ वर्षांची आणि मी १३ वर्षांचा होतो. आम्ही डेट करत होतो.

विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी १८ वर्षांचा होतो आणि ती १७ वर्षांची होती, तेव्हा आम्ही नात्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. मला वाटले आता सर्व सेट आहे. मी ठरवलेलं आम्ही एकत्र कॉलेजला जाऊ, लग्न करू आणि मग आम्हाला मुलं होतील. मी माझ्या भावी आयुष्याची मनात आधीच प्लॅनिंग करुन ठेवली होती.

पण गर्लफ्रेंडच्या आकस्मिक निधनाने विवेक ओबेरॉयच्या मनातला भावी संसार उद्ध्वस्त झाला. तो म्हणाला, ‘मी तिला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती उत्तर देत नव्हती. तिने मला आधी सांगितले होते की तिची तब्येत बरी नाहीये. मला वाटले की तिला फक्त सर्दी झाली असेल. मला तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी संपर्क साधता येत नव्हता, तेव्हा मी तिच्या चुलत बहिणीला फोन केला, तिने मला सांगितले की ती हॉस्पिटलमध्ये आहे.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी हॉस्पिटलमध्ये धावलो. आम्ही ५-६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो आणि ती माझ्या स्वप्नातील मुलगी होती. तेव्हा मला कळले की ती लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या अंतिम टप्प्यात होती. मला धक्काच बसला. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही दोन महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. मी त्यावेळी अगदी खचलो होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *