युजवेंद्र चहल घेतोय घटस्फोट?, धनश्री वर्माला मोठा सल्ला, मॅडम तुम्ही…
मुंबई : भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सतत त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा या रंगताना दिसत आहेत. नुकताच युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली. मात्र, दोघांनीही लग्नाच्या वाढदिवसाची एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. यामुळेच घटस्फोटाच्या चर्चांना एकप्रकारे वारे मिळाले. दुसरीकडे युजवेंद्र चहल हा सोशल मीडियावर सक्रिय असून इंस्टा स्टोरीला सतत स्टोरी शेअर करताना दिसतोय.
युजवेंद्र ज्याप्रकारच्या इंस्टा स्टोरी शेअर करतोय, त्यावरून असा अंदाज लावला जातोय की, त्याच्या खासगी आयुष्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसते. नुकताच धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. मॅगझीनच्या कव्हर पेजचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये धनश्री वर्माचा लूक जबरदस्त दिसतोय. चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.
धनश्री वर्माने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने तिला मोठा सल्ला दिल्याचे दिसतंय. मॅडम युजी भाऊला सोडू नका…त्यांच्यामुळेच तुमची ओळख आहे. आता या कमेंटची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. यासोबतच चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट धनश्रीच्या फोटोवर करत आहेत. धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर कायमच आपल्या डान्सचे खास व्हिडीओ शेअर करताना दिसते. बऱ्याचदा तिच्यासोबत डान्स करताना युजवेंद्र चहल हा देखील दिसतो.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले. दोघांची लव्ह स्टोरी देखील अत्यंत खास आहे. धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करून लाईक करताना कायमच युजवेंद्र चहल हा दिसत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो धनश्रीच्या पोस्टला लाईक करतानाही दिसत नाही. दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा असताना चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.