देश

श्रीराम भक्तांसाठी Good News, अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

लखनऊ : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रशासनाने प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता रामलल्लाच्या दर्शनासाठीही भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंदिर प्रशासनाने रामलल्लाच्या दर्शनाची वेळ एक तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सोमवारी याबद्दल माहिती दिली आहे.

अनिल मिश्रा यांनी सांगितले की, प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांची सोयीच्या अनुषंगाने ट्रस्टने रामललाच्या दर्शनाची वेळ १ जानेवारीपासून एक तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी २२ जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. सात प्रवेश मार्ग वापरले. प्रवाशांच्या सोयीसाठी वस्तू ठेवण्याची व चप्पल ठेवण्याची व्यवस्था आहे. जवळपास दोन हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. त्यानंतर दर्शन घेता येणार आहे.

अनिल मिश्रा पुढे म्हणाले, भाविकांना सुरक्षा देखील पुरवण्यात येते. सुरक्षेसहित भाविक चार रांगांमधून गाभाऱ्याच्या दिशेने जातात. तेथील रामलल्लाचे दर्शन अतिशय दिव्य असते. दररोज तीन लाख लोक सहज या मंदिरात भेट देऊ शकतात. तर रांगेत उभे राहून जवळून दर्शन घेण्याची सोय देखील आहे. यासोबतच बाहेर पडण्याच्या मार्गावर प्रसादाची व्यवस्था आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद मिळतो. प्रत्येक रांगेत बसण्यासाठी एक बेंच देखील आहे. ४० ते ४५ मिनिटांत तीन लाख लोक दर्शन घेऊ शकतात अशी व्यवस्था आहे. तर येत्या नव्या वर्षात १ जानेवारीपासून दर्शनाचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनाचा कालावधी हा एक तासाने वाढणार असून त्यामुळे १ जानेवारी आणि महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *