शिक्षण

BAMU University: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीचा प्रस्ताव नाहीच

आशिष चौधरी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचे प्रस्ताव अद्याप सादर केले नाहीत. परिगणना करून १६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा, असे निर्देश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिले होते. आठवडा उलटला परंतु अद्याप प्रस्तावच आले नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यातील अनेक तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत जाहीर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बहुतांशी जिल्हे दुष्काळग्रस्त भागात आहेत. वर्षभरानंतर एकाही विद्यार्थ्याला शुल्कमाफीचा लाभ मिळालेला नाही. विद्यापीठाने पाठविलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अचूक परिगणना करुन तो प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे निर्देश उच्च शिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. त्यासाठी १६ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. विद्यापीठाने महाविद्यालयांना बोलावून प्रस्तावांची परिगणना केल्याचे सांगण्यात येते. परंतु अद्याप सुधारित प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

MBBS admission: ‘त्या’ विद्यार्थिनीसाठी नवी जागा; एमबीबीएस प्रवेशाबाबत सीईटी कक्ष आणि कॉलेजला निर्देश

विद्यापीठाने सुरुवातीला सादर केलेल्या प्रस्तावात विद्यार्थ्यांची संख्या ८५ हजार ७६९ इतकी दर्शविलेली होती. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत देण्यासाठी पाच कोटी ५० लाखांच्या अनुदानाची गरज असल्याचे नमूद केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *