शिक्षण

GATE exam date 2025: यंदाची ‘गेट’ परीक्षा १ ते १६ फेब्रुवारीदरम्यान, वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर

GATE exam eligibility: इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, स्थापत्यशास्त्र, आणि विज्ञान या विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग’ (गेट) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. रूरकी आयआयटीने जाहीर केल्याप्रमाणे ही देशव्यापी परीक्षा १ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि विज्ञान या विषयांमधील एमई, एमटेक आणि पीएचडी अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गेट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होते. यामध्ये मिळालेल्या गुणांचा वापर भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे (पीएसयू) विविध पदांसाठी उमेदवारांची भरदी करण्यासाठीही केला जातो. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत गेल्या दोन महिन्यांपासून देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आयआयटी रूरकीने अर्ज सुधारण्यासाठीची अंतिम मुदत वाढवली होती.

अभियांत्रिकीतील ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट ( GATE ) ही भारतामध्ये घेण्यात येणारी एक प्रवेश परीक्षा आहे जी तांत्रिक पदव्युत्तर कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या पदवीपूर्व विषयांची चाचणी घेते . GATE हे भारतीय विज्ञान संस्था आणि रुरकी, दिल्ली , गुवाहाटी , कानपूर , खरगपूर , चेन्नई (मद्रास) आणि मुंबई (बॉम्बे) येथील सात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आणि राष्ट्रीय समन्वय मंडळाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *