क्रीडा

India vs Pakistan : टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवलं,आशिया कप हॉकी स्पर्धेत इतिहास रचला

सालालाह: ओमानमध्ये सालालाह येथे सुरु असलेल्या ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय टीमनं दमदार खेळी करत विजेतेपदावर नाव कोरलं. आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय हॉकी टीमची लढत पाकिस्तान बरोबर होती. काल झालेल्या सामन्यात भारतीय टीमनं पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत विजय मिळवला.

या विजयासह टीम इंडियानं इतिहास रचला आहे. ज्युनिअर हॉकी इंडिया टीम सर्वाधिक वेळ आशियाई स्पर्धेतील विजेतपद पटकावणा संघ ठरला आहे. भारतीय टीमनं यामध्ये ही पाकिस्तानला मागं टाकलं आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ विजेतेपद आहेत तर आता भारताच्या नावावर चार विजेतेपद आहेत.

भारतासाठी अंगद बीर सिंह यानं १२ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अराइजीत सिंह हुंडल यानं १९ व्या मिनिटाला गोल केला. भारतानं या गोल सह निर्णायक आघाडी मिळवली होती. पाकिस्ताननं ३७ व्या मिनिटाला एक गोल केला. तो गोल पाकिस्तानच्या बशारत अली यानं केला. पाकिस्ताननं अखेरच्या काही मिनिटांमध्ये खूप आक्रमक खेळ केला. भारताच्या बचाव फळीनं दमदार कामगिरी करत पाकिस्तानचं आक्रमण थोपवलं.

आठ वर्षानंतर स्पर्धा

तब्बल आठ वर्षानंतर ज्युनिअर आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यापूर्वी २०१५ मध्ये मलेशियामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. भारतीय संघानं यंदाच्या हंगामात दमदार खेळी केली. टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियावर ९-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. तर, पाकिस्ताननं मलेशियाचा ६-२ पराभूत केलं होतं.

टीम इंडियाची दमदार कामगिरी

उत्तम सिंह च्या नेतृत्त्वातील भारतीय टीमनं या स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद पटाकवलं. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना अनिर्णित राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *