शिक्षण

MAH CET 2025: एमबीए, एमएमएस सीईटीची नोंदणी सुरू; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदत, अर्जाची Direct link

रोहन टिल्लू, मुंबई : MAH-MBA/MMS-CET-2025| पुढील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायला इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सीईटी कक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा या हेतूने १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करणाऱ्या सीईटी कक्षाने आता प्रत्यक्ष नोंदणीलाही सुरुवात केली आहे. एमबीए/ एमएमएस, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी प्रवेश अर्ज भरण्यास कक्षाने एका महिन्याची मुदत दिली आहे. सीईटी कक्षाने याबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

राज्य सीईटी कक्षाने यंदाच्या प्रवेश परीक्षा मार्च महिन्यापासून नियोजित केल्या आहेत. १६ मार्च ते २७ एप्रिल या ४५ दिवसांच्या कार्यकाळात या परीक्षा होण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. यामध्ये एम. एड., एम. पी. एड., एमबीए/ एमएमएस नंतर एलएलबी तीन वर्ष, एमसीए, बी.एड., बी. पी. एड., एम. एचएमसीटी, बी. एचएमसीटी/ एम. एचएमसीटी एकात्मिक, बीए.एड. / बीएससी बी.एड. (एकात्मिक), बी.एड.- एम. एड. (तीन वर्ष एकात्मिक), बी. डिझाईन या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे.

GATE exam date 2025: यंदाची ‘गेट’ परीक्षा १ ते १६ फेब्रुवारीदरम्यान, वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर

यापैकी एमबीए/ एमएमएस, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी २५ जानेवारीपर्यंतची मुदत सीईटी कक्षाने दिली आहे. उर्वरित अभ्यासक्रमच्या परीक्षा साठी नोंदणी सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, २०१५ च्या कलम १० नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. CET सेल भारतातील महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *