व्यवसाय

60:40 Investment Rule : गुंतवणुकीचा 60:40 नियम सध्या फायदेशीर ठरतो का? जाणकार नेमकं काय म्हणतात?

एखादा व्यक्ती नोकरी सुरु करतो किंवा व्यवसाय सुरु करतो. नोकरीतून आणि व्यवसायातून मिळणाऱ्या रकमेपैकी ठराविक रकमेची भविष्यातील खर्चासाठी गुंतवणूक करत असतो.  गुंतवणूकदारांमध्ये 60:40 हा गुंतवणुकीचा नियम प्रसिद्ध आहे. अनेक जण या नियमानुसार गुंतवणूक करत असतात. या नियमानुसार 60 टक्के रक्कम इक्विटी शेअर बाजारात गुंतवली पाहिजे. तर, 40 टक्के रक्कम बाँड किंवा निश्चित उत्पन्न साधनं म्हणजेच डेब्ट फंडमध्ये गुंतवले जातात. दीर्घ काळाचा विचार करता चांगला परतावा मिळावा आणि त्याचवेळी सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न देखील सुरु राहावं असं या नियमाद्वारे अपेक्षित असतं. आता मात्र हा नियम गुंतवणुकीच्या दृष्टीनं फायदेशीर आहे असा सवाल उपस्थित केला जातो. मनीकंट्रोल हिंदीनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

60:40  गुंतवणुकीचा हा नियम आज देखील चांगली सुरुवात ठरु शकतो. मात्र, प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला वेगळा असू शकतो. गुंतवणुकीच्या जगात समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. फक्त एखाद्या नियमावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवण्यापेक्षा जोखीम समजून घेऊन गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे.

 

जुनी रणनीती, नवा विचार

जाणकारांच्या मते हे मॉडेल आज देखील फायदेशीर आहे. मात्र, प्रत्येक गुंतवणूकदारानं या यापूर्वी ज्या नियमानुसार गुंतवणूक केली जायचे ते मॉडेल प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरु शकत नाही. बाजारात वेगानं बदल होत आहेत. जागतिक संकट, तंत्रज्ञानाचा विकास आणि व्याज दरातील बदल होत असतात. या काळात गुंतवणूकदारांचा विचार आणि प्राथमिकता बदलत आहेत.  द वेल्थ कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर प्रसन्ना पाठक यांच्या मतानुसार बॉण्ड वर मिळणारा परतावा अधिक असू शकतो. सध्या देखील 60:40 मॉडेल फायदेशीर ठरेल, असं त्यांनी म्हटलं.

टाटा असेट मॅनेजमेंट इक्विटीचे प्रमुख राहुल सिंह यांच्या मते नवे गुंतवणूकदार प्रामुख्यानं तरुण जोखीम घेण्यासाठी मागं पुढं पाहत नाहीत. वेगवान रिटर्न साठी लोक स्मॉल कॅप, थीमॅटिक फंडस् मध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, ही गुंतवणूक जोखीमपूर्ण असू शकते. राहुल सिंह यांच्या मते  गुंतवणूकदारांनी फ्लेक्सी कॅप, मिड कॅप लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यामुळं जोखीम आणि परतावा यांचं संतुलन राहील.

काही जाणकारांच्या मते 60:40 हा निश्चित किंवा फिक्स फॉर्म्युला नाही. ही सुरुवातीची मार्गदर्शक तत्वं आहेत. यामुळं गुंतवणूकदारानी गुंतवणूक टारगेट आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार पोर्टफोलिओ तयार करावा. तरुण गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार आहेत. मात्र, त्यांच्याकडे फायनान्शिअल बॅकअप नसतो. जर एखाद्या क्षेत्रात घसरण झाली तर त्यांचं नुकसान होत. त्यामुळं पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा. गुंतवणूकदारांनी 5 किंवा 10 वर्षांच्या गुंतवणुकीचं नियोजन करताना वेळोवेळी पोर्टफोलिओचं समीक्षण करावं, आवश्यकता असल्यास त्यात बदल करावेत. आता इक्विटी, डेटसह सोन्यातील गुंतवणूक देखील चांगला पर्याय बनत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *