Uncategorizedजीवनशैली

Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश, तुर्कीची कंपनी अन् रद्द झालेला करार, टर्किश टेक्निक काय काम करायची?

Air India Plane Crash: तुर्कीची कंपनी टर्किश टेक्निक ही जागतिक ग्लोबल एविएशन सर्विस प्रोव्हायडर कंपनी आहेत.  एअर इंडिया बोईंग विमानांना या कंपनीकडे देखभालीसाठी पाठवायची.

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 मे रोजी एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स मिळून 242 व्यक्ती होते. त्यापैकी एक प्रवासी बचावला आहे. तर, विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं ते ज्या हॉस्टेलमधील काही विद्यार्थी आणि इतर मिळून 265 जणांचा मृत्यू झाला आहे.

एअर इंडियाचं विमान क्रॅश का झालं या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही. या बाबत स्पष्ट माहिती समोर आली नाही. सरकारकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाचं इंजिन फेल झाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज आहे. एअर इंडियाची बोईंग विमानं काही दिवसांपूर्वीपर्यंत देखभालीसाठी तुर्कीच्या कंपनीकडे पाठवली जायची. मात्र, काही दिवसांपूर्वी एअर इंडियानं करार रद्द केला होता.

 

तुर्कीच्या कंपनीकडे देखभालीचं काम

तुर्कीची टर्किश टेक्निक ही ग्लोबल एविएशन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. भारतातील इतर काही कंपन्यांदेखील या टर्किश टेक्निकची सेवा घ्यायच्या. यामध्ये एअर इंडिया आणि इंडिगोचा समावेश होता. एअर इंडिया एअरलायन्सकडून बोईंग 777 देखभालीसाठी टर्किश टेक्निकडे पाठवायची. यामध्ये पायाभूत देखभाल,  दुरुस्ती आणि रेट्रोफिटचं काम केलं जायचं. एअर इंडिया टर्किश कंपनीसोबत एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि इतर काही देशांच्या विमानांची देखभाल करायची.

भारत पाक संघर्षानंतर करार रद्द

भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यात मे महिन्यात संघर्ष झाला होता. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं त्यावेळी तुर्कीनं पाकिस्तानला साथ दिली होती. त्यामुळं भारतात बहिष्काराचा ट्रेंड सुरु झालं होतं. एअर इंडियानं टर्किश टेक्निक सोबतचा करार रद्द केला होता. द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत काही दिवासंपूर्वी एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी काही विमानं देखभालीसाठी टर्किश टेक्निककडे पाठवली होती, असं म्हटलं होतं.

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानातील 230 प्रवाशांपैकी 169  प्रवासी भारतीय होते. तर, 53 ब्रिटीश नागरिक, 6 पोर्तुगालचे आणि एक कॅनडाचा एक प्रवासी होता. यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *